Online Repository to help Balbharati Shikshikas to Awaken the cultural and patriotic values hidden in the kids through group activities.

खादाड बकरा

 खादाड बकरा

एका राजाजवळ खादाड बकरा होता.

राजाने दवंडी दिली, बक-याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल,

 त्याला अर्धे राज्य बक्षीस.

 पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईन.

काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला.

 बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले.

 संध्याकाळी त्याला वाटले,
दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार.

 तो बक-याला घेऊन राजाकडे आला.

 राजाने हिरवे गवत
टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला.

राजा म्हणाला, याला पोटभर खाऊ घातले नाहीस.

अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते.

नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले.

पण कोणालाच यश आले नाही.

 एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे.

काम युक्तीने केले पाहिजे.

त्याने बकरा जंगलात नेला. बक-याने गवत खायला सुरूवात केली की,

तो
बक-याला काठीने मारीत असे.

दिवसभर असे घडल्याने बक-याची
मानसिकता अशी झाली की,

 गवताला तोंड लावले की मार मिळतो.

संध्याकाळी सुविचारी मनुष्य बक-यासह दरबारात आला.

 राजाने गवत टाकले.

 बकरा त्याकडे पहायला तयार होईना.

कारण गवत खाल्ले की मार बसण्याची भीती!
         तात्पर्य

 मनही असेच आहे, तृप्त न होणारे.

त्याचे विवेकाने ताडन केले तरच ते ताब्यात राहील.

 अन्यथा, अहंकाराचा, विकारांचा, वाईट सवयींचा चारा त्याला पुष्ट करील.

 विकार दूर झाला की अंत:करण शुद्ध होते.

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.

मानवाला प्रगतीच्या दिशेने नेतात....

0 comments:

Post a Comment

A Glimpse..

  • Clay Ganesha
  • Clay Ganesha
  • Chirtakoot - Sankrathi Celebration
  • Independence day Celebration at Lotus Petals
  • Chiranthana - Varshikotsav
  • Chitrakoot - Rangoli
  • JC nagar -Chirantana

BB Magazine MAY 2020

Yojana - MAY 2020

BB Magazine APRIL 2020

Yojana - APRIL 2020

Popular Posts

Blog Archive

Powered by Blogger.

Translate